कुसुम सोलर पंप योजना 2024 || PM Kusum Solar Yojana

कुसुम सोलर पंप योजना 2024 || PM Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana

PM Kusum Solar Yojana

PM Kusum Solar Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर,आता होणार वीज बिलात महाबचत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी सरकारने कुसुम सोलर पंप योजनेची सुरुवात केली आहे.

PM Kusum Solar Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर,आता होणार वीज बिलात महाबचत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी सरकारने कुसुम सोलर पंप योजनेची सुरुवात केली आहे. आधुनिक शेतीची सुरुवात करा तुमच्यापासून.

संपुर्ण देशात PM कुसुम सोलर योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात याची अंमलबावणी महा ऊर्जा मार्फत केली जाते.याच महाऊर्जा च्या अधीकृत website वरून तुम्ही कुसुम सोलर योजनासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.

Kusum Solar Yojana योजनेची माहिती

  • प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येणार आहे.
  • ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे.
  • PM Kusum Solar Yojana​ 2024-2025 खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
  • प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे

कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्टये

  • पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
  • शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप mahaurja solar pump उपलब्ध होणार.
  • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे.

JOBB

कुसुम सोलर पंप योजना फायदा

  • महाराष्ट्र राज्यात शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि म्हणूनच शेती व्यवसायात क्रांती घडवून आणण्यासाठी कुसुम सोलर कृषीपंप योजना महत्वाची आहे.
  • तसेच ही योजना राज्यभरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि सरकारला देखील परवडणारी आहे.
  • कुसुम सौर पंप योजनेचे उद्दिष्ट हे सिंचनासाठी पारंपारिक उर्जा स्त्रोतांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांमध्ये सौर उर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.
  • सौर पंप बसवून ही योजना वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यास मदत करते आणि या योजनेमुळे पर्यावरण संवर्धन राखण्यासाठीही योगदान देते.
  • सौर ऊर्जेचा सिंचनासाठी उपयोग करून शेतकरी त्यांचे लक्षणीय वीज बिल कमी करून त्यांच्या खर्चातील बचत आणि महाग डिझेल किंवा विजेवर चालणाऱ्या पंपांची गरज कमी करू शकतो. सद्या वीजबिले अवाजवी येत आहेत, आणि वेळेत भरले नाहीतर त्यावर व्याज देखील आकारले जाते.
  • सौर पंप सिंचनाच्या उपलब्धतेमुळे, शेतकरी त्यांचे पीक उत्पादन वाढवू शकतात, ज्यामुळे उच्च उत्पन्न वाढून शेतकर्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ उतारा – 7/१२ उतारा मध्ये एका पेक्षा जास्त नावे असल्यास रु. २००/- च्या मुद्रांक कागदावर ना हरकत / संमती पत्र बनवून घ्यावे. 7/१२ मध्ये एकच नाव असल्यास आवश्यकता नाही.
  • आधारकार्ड प्रत.
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • शेतजमीन / विहीर / पाण्याचा पंप सामुहिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
  • जातीचा दाखला आवश्यक असल्यास.

good

योजनेअंतर्गत अनुदान

कुसुम सोलर कृषी पंप हा त्याच्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार उपलब्ध होतो. कृषी पंप क्षमता आणि त्यानुसार किंमत आणि सबसिडी पुढील प्रमाणे देण्यात आली आहे.

शेतकऱ्याला फक्त खाली दिलेली रक्कम भरावयाची आहे, शेतकर्यांना इतर अन्य कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.

3 एच.पी.

  • खुला – रु 19,380
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – रु 9,690

5 एच पी

  • खुला – रु 26,975
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – रु 13,488

7.5 एच.पी.

  • खुला – रु 37,440
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – रु 18,720

ऑनलाईन अर्ज

  • सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाऊर्जा च्या अधिकृत वेबसाईट वर यावं लागेल.
  • वेबसाईट वर आल्यावर उजव्या बाजूला खाली तुम्हाला कुसुम सोलर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा
  • लिंक वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक सूचना सांगण्यात येईल ज्यामध्ये तुम्हाला कुसुम सोलर योजनेसंर्भात नियम व अटी दिसतील.
  • ही सूचना वाचून बंद केल्यावर तुमच्यासमोर एक फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती सविस्तरपणे भरायची आहे.
  • सर्वात आधी safe village लिस्ट पाहावी लागेल जर तुमचं गाव या safe village लिस्ट मध्ये असेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक नाही म्हणून नोंदनी करू शकता.
  • जर या safe village लिस्ट मध्ये तुमच गाव नसेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक आहे म्हणून नोंदनी करू शकता.
  • जर तुम्ही डिझेल पंप ग्राहक आहात हा पर्याय निवडला तर तुम्हाला त्याबद्दल माहिती द्यावी लागेल, जसे की पंपाचा प्रकार,तो जमिनीवरील आहे की पाण्यातील,वर्षाला तो किती डिझेल खातो अशी माहिती तुम्हाला भरावी लागेल.
  • जर तुम्ही डिझेल पंप ग्राहक नाही हा पर्याय निवडला तर तुम्हाला वरील महिती भरायची गरज नाही.
  • डीझेल पंपाबाबत महिती दिल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक आणि जमिनीबाबत माहित भरावी लागेल.
  • सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडावे लागेल.
  • नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून तुमची जी काही cast असेल ती निवडावी लागेल. लक्षात ठेवा एक मोबाईल नंबर वर एकच अर्ज केला जाऊ शकतो.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यावर payment for online application हा पर्याय तूमच्या समोर येईल. त्यावर क्लिक करा.
  • आता payment for online application या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर जमिनीची माहिती वर पंप कोटा दाखवला जाईल.
  • पुढे जा वरती क्लिक केल्यावर तुम्हाला ऐका नवीन पेजवर redirect केलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा डिझेल इंजिन पंपबद्दल माहिती भरावी लागेल जशी आपण सुरवातीला भरली होती तशी.नंतर तुम्हाला खाली तुमची वयक्तिक माहिती भरलेली दिसेल जसे आधार कार्ड, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका,गाव.
  • पुढें तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती भरावी लागेल जसे की आपली जमीन कुठे आहे किती आहे , 8 अ ,7/12 नंबर वैगरे.इ .
  • ही सर्व माहिती भरून झाल्यावर खाली असलेल्या proceed to payment या ऑप्शन वर क्लीक करा.
  • Proceed to payment या वर क्लीक केल्यावर तुमच्या समोर अजून एक बॉक्स उघडेल ज्यामध्ये तुमचा transaction I’d आणि 15 रुपयांच पेमेंट करायचं अस दिसेल. नंतर खाली असलेल्या proceed to payment वर क्लीक करा.
  • हे ऑनलाईन पेमेंट 15 रुपयांच असेल. पेमेंट successfull झाल्यावर तुमच्या मोबाईल वर ऐक OTP पाठवला जाईल हा OTP टाकून Verify केल्यावर तुमच्या मोबाईल वर एक युजर आयडी अर्थात MK Id आणि पासवर्ड पाठवला जाईल.
  • युजर आयडी अर्थात MK Id आणि पासवर्ड टाकून आपण Log In करू शकता आणि आपल्या अर्जाची पाहणी करू शकता.

studyhardwork

⬇️ इतरांना शेअर करा ⬇️
WhatsApp
Facebook
Telegram
Email

join

⬇️⬇️ अशाच प्रकारची माहिती साठी पुढील लिंक वापरा ⬇️⬇️

अस्वीकरण : या वेबसाइटवर प्रकाशित परीक्षेचे निकाल / गुण हे केवळ परीक्षार्थींना तात्काळ माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असायला हवेत असे नाही. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितकी अस्सल उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या परीक्षेच्या निकालांमध्ये/गुणांमध्ये झालेल्या कोणत्याही अनवधानाने झालेल्या त्रुटीसाठी आणि या वेबसाइटवरील माहितीच्या उणीवा, दोष किंवा चुकीमुळे कोणाचेही नुकसान किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वरती जाण्यासाठी

Discover more from CIV मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

NABARD INTERNSHIP MMFI : Sales,Deola. Sumukha India – Regional Manager DSR GROUP : Pesticide & Nutrition Company DSR GROUP : Pesticide & Nutrition Company