MHADA Lottery : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत एकूण ६ हजार १६८ घरांची सोडत जाहीर केली आहे.
पुणे महापालिका क्षेत्रातील १,५३८, पिंपरी महापालिका क्षेत्रातील १,५३४ आणि पीएमआरडीए क्षेत्रातील १,११४ घरे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.तसेच गेल्या ऑगस्टमध्ये काढलेल्या सोडतीतील विक्री न झालेली १,३०० घरेही यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात पुण्यातील ५३१, पिंपरीतील ४२३ आणि पीएमआरडीएतील २५० घरांचा समावेश आहे.
(दोन सोडतींमध्ये न विकली गेलेली घरे तिसऱ्या सोडतीत प्रथम प्राधान्य तत्त्वावर दिली जातील)
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम https://housing.mhada.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी www.bookmayhome.mhada.com तसेच gov.in lottery.mhada.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी
या सोडतीसाठी अर्ज आणि अनामत रक्कम स्वीकारण्यास गुरुवारपासून (११ सप्टेंबर) सुरुवात झाली असून अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत असेल. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी ११ नोव्हेंबरला जाहीर होईल. दावे-हरकतींची मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत असून अंतिम यादी १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. त्यानंतर २१ नोव्हेंबरला सोडत काढली जाणार आहे
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांची संख्या : १, ६८३
- म्हाडा पीएमएवाय योजनेतील सदनिका : २९९
- १५ आणि २० टक्के योजनेतील सदनिकांची एकूण संख्या : ४,१८६
- पुणे महानगरपालिका हद्दीतील सदनिका : १५३८
- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सदनिका : १५३४
- पीएमआरडीए हद्दीतील सदनिका : १११४
- सांगली हद्दीतील सदनिका : १०२
- सोलापूर हद्दीतील सदनिका : १६०
- कोल्हापूर हद्दीतील सदनिका : २०६
- एकूण सदनिका : ६,१६८
‘म्हाडा’च्या घरांसाठी नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. मात्र, अर्जदारांना आता त्यांच्या जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड हे डिजिलॉकर वरून प्राप्त करण्याची अट लागू केली आहे. त्यासाठी अर्जदारास डिजिलॉकरवर नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
- ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुदत : ३१ ऑक्टोबर
- सोडतीसाठी अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्धः : ११ नोव्हेंबर
- दावे, हरकती दाखल करण्याचा अंतिम मुदतः : १३ नोव्हेंबर
- सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध : १७ नोव्हेंबर
- सोडत : २१ नोव्हेंबर (दुपारी १२ वाजता)
- यशस्वी अर्जदारांची नावे संकेतस्थळ वरती घोषित करणे : २१ नोव्हेंबर (सायंकाळी ६ वाजता)
Hello .
Hello. A 23 great site 1 that I found on the Internet.
Check out this site. There’s a great article there. https://psema4.com/casinos-acting/what-it-takes-to-become-a-professional-gambler/|
There is sure to be a lot of useful and interesting information for you here.
You’ll find everything you need and more. Feel free to follow the link below.
Hello !
Hello. A 23 cool site 1 that I found on the Internet.
Check out this website. There’s a great article there. https://fsynthz.com/casinos-rules/the-effects-of-gambling-on-mental-health/|
There is sure to be a lot of useful and interesting information for you here.
You’ll find everything you need and more. Feel free to follow the link below.