महाराष्ट्र शासनाने पोलीस आणि कारागृह विभागातील रिक्त जागा भरतीला मंजुरी दिली आहे. या भरती प्रक्रियेत १५,६३१ पदांसाठी भरती होणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यानच्या रिक्त जागा आणि १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या अपेक्षित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
भरतीमध्ये एकूण १५,६३१ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या १२,३९९ जागा, पोलीस शिपाई चालक पदाच्या २३४ जागा, बँड्समनच्या २५ जागा, सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या २,३९३ जागा आणि तुरुंग शिपाई पदाच्या ५८० जागांचा समावेश आहे.
खुला प्रवर्गासाठी अर्जाची फी ४५० रुपये आहे, तर राखीव प्रवर्गासाठी ३५० रुपये आहे. जमा झालेली फी भरती प्रक्रियेच्या खर्चासाठी वापरली जाईल.
१०० टक्के जागा भरण्याची परवानगी : नियमानुसार प्रशासकीय विभागांना केवळ ५०% रिक्त जागा भरण्याची परवानगी आहे. परंतु, पोलीस आणि कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांची निकड लक्षात घेता, शासनाने १००% जागा भरण्याची परवानगी दिली आहे. भरती प्रक्रियेत काही नियम शिथिल करण्यात आले आहेत