कॉलेजमध्ये प्रवेश (College Admission) होणार वर्षातून दोनदा || पहा कोणते आहेत अभ्यासक्रम

कॉलेजमध्ये प्रवेश (College Admission) होणार वर्षातून दोनदा || पहा कोणते आहेत अभ्यासक्रम

College Admission
College Admission

कॉलेजमध्ये प्रवेश (College Admission) होणार वर्षातून दोनदा

आतापर्यंत ‘यूजीसी’ने फक्त ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठीच वर्षातून दोनवेळा प्रवेश देण्याची मुभा दिली होती. आता ही मुभा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही अभ्यासक्रमांना मिळेल. अर्थात, वर्षातून दोनवेळा प्रवेश देणे अनिवार्य नाही. संबंधित विद्यापीठांनी व् महाविद्यालयांनी आपापला निर्णय घ्यायचा आहे, असे जगदीश कुमार यांनी मंगळवारी सांगितले. ज्या विद्यापीठांकडे किंवा शैक्षणिक संस्थांकडे आपली पुरेशी साधने किंवा शिक्षक उपलब्ध आहेत. अशी सर्व विद्यापीठे ही या निर्णयाची अंमलबजावणी करू शकतात, असेही जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या निर्णयामुळे महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढवण्याची संधी मिळेल तसेच भविष्यवेधी अभ्यासक्रमही सुरू करता येतील. वर्षातून दोनदा प्रवेशाची पद्धत सुरू करण्याआधी संबंधित संस्थांना त्यांच्या नियमांत बदल करून घ्यावे लागणार आहेत. जगभरातील विद्यापीठांमध्ये यापूर्वीच वर्षभरात दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. भारतीय विद्यापीठेदेखील या प्रणालीचा अवलंब करत असतील, तर आपल्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि विद्यार्थ्यांच्या देवाण-घेवाणीसही मदत होईल.

हा होणार फायदा

* दोनदा प्रवेशाचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना. बोर्डाच्या निकालांना विलंब, आजारपण व वैयक्तिक कारणाने प्रवेशापासून वंचित राहणाऱ्यांना मिळणार संधी.

* काही विद्यार्थी चालू सत्रात प्रवेश घेण्यापासून वंचित राहतील. त्यांना संपूर्ण वर्षभर न थांबता पुढील सत्रात तत्काळ प्रवेश मिळणार आहे.

* या निर्णयामुळे उद्योग जगतातील कंपन्यादेखील आपली कर्मचारी भरतीची प्रक्रिया (कॅम्पस् इंटरव्ह्यूज) वर्षातून दोन वेळा राबवू शकणार आहेत. विद्यापीठांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे तत्काळ रोजगार मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वरती जाण्यासाठी

Discover more from CIV मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

NABARD INTERNSHIP MMFI : Sales,Deola. Sumukha India – Regional Manager DSR GROUP : Pesticide & Nutrition Company DSR GROUP : Pesticide & Nutrition Company