MH Local Body Elections : राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले ; आचारसंहिता लागू

Election

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम 

  • अर्ज दाखल करण्याची सुरुवात: 10 नोव्हेंबर
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 18 नोव्हेंबर
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर
  • मतदान: 2 डिसेंबर
  • मतमोजणी: 3 डिसेंबर

नगर परिषदा: 246 (यामध्ये 10 नवनिर्मित आणि 236 मुदत संपलेल्या नगर परिषदांचा समावेश आहे.)

नगर पंचायती: 42 (यामध्ये 15 नवनिर्मित आणि 27 मुदत संपलेल्या नगर पंचायतींचा समावेश आहे. उर्वरित 105 नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही.)

नगर परिषदा

नगर पंचायती

  • यांची सदस्य संख्या साधारणपणे 20 ते 75 असते.
  • निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहे.
  • सदस्य संख्या विषम असल्यास, एका प्रभागात 3 जागा असतील.
  • मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी आणि नगर परिषदेच्या अध्यक्षांसाठी असे एकूण मते द्यावी लागतील.
  • येथे 17 सदस्य संख्या असते.
  • मतदारांना 1 सदस्य आणि 1 अध्यक्ष अशा दोन पदांसाठी मतदान करावे लागेल.

SHARE WITH

WhatsApp
Facebook
Telegram
Print
Email

JOIN OUR FAMILY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *